ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या वक्तव्याचे आश्चर्य…

73
2
Google search engine
Google search engine
Google search engine

काँग्रेस प्रभारी सुभाष चव्हाण ; सावंतांनीच काँग्रेस प्रवेशाबाबत माझ्याशी संपर्क साधला…

मालवण, ता. १८ : ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी माझ्याशी संपर्क साधत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रवेशाची तारीखही त्यांनीच सांगितली होती. अशा परिस्थितीत त्यांनी कणकवलीत केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते असे मत काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याबाबत सावंत यांनी स्वतः माझ्याशी, प्रदेश पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यांची हायकमांडशी भेट झाली नसेल. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यानेच त्यांना जिल्ह्यात येऊन काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्याची विनंती केली होती. जर त्यांना काँग्रेस प्रवेश करायचा नव्हता तर त्यांनी काँग्रेससाठी आपण काही उमेदवार दिले असे वक्तव्य कसे केले. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

\