कुडाळकरांनी तोंडघशी पाडले ; पण मोंडकरांनी लाज राखली…

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुभाष चव्हाण ; मतदार संघात चमत्कार घडेल…

मालवण, ता. १८ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघासाठी हायकमांडने दिलेली उमेदवारी ऐनवेळी नाकारून काका कुडाळकर यांनी आम्हाला तोंडघशी पाडले. या नाट्यमय घडामोडीत अरविंद मोंडकर यांनी उमेदवारी स्विकारत काँग्रेसची लाज राखली. प्रचारासाठी अल्प काळ मिळूनही मोंडकर यांनी दोन्ही तालुक्यात चांगली मेहनत घेतली आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता मोंडकरांचा विजय निश्चित आहे असा दावा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.
काँग्रेस आघाडीचे उमेदवार अरविंद मोंडकर यांच्या प्रचार कार्यालयास सुभाष चव्हाण यांनी सायंकाळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, इर्शाद शेख, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, योगेश्वर कुर्ले, गणेश पाडगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवारीच्या वेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अशा परिस्थितीत मोंडकर यांनी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे काँग्रेसची लाज राखली गेली. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्यावतीने मी मोंडकर यांचा आभारी आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारत तोंडघशी पाडणार्‍या कुडाळकरांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. आघाडीचे उमेदवार म्हणून मोंडकर यांनी चांगली मेहनत घेतली असून त्यांना काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांची चांगली साथ मिळत आहे. राज्यातील परिस्थिती पाहता या निवडणुकीत नक्कीच चमत्कार घडेल आणि मोंडकरांच्या विजयासह राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

\