मुख्यमंत्र्यांशी खोटे बोलून केसरकरांनी मंत्री पद पदरात पाडून घेतले

97
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणे: स्वतःच्या फायद्यासाठी पालकमंत्र्यांनी ठेकेदाराकडे पैसे मागितल्याचा आरोप

सावंतवाडी ता.१८: पुढच्या वेळी “मी” तुमच्या सोबत असेन असे मुख्यमंत्र्यांना खोटे सांगून दीपक केसरकर यांनी मंत्री पद आपल्या पदरात पाडून घेतले,अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे केली.तिलारी चे पाणी मालवण पर्यंत नेण्याची योजना पूर्ण होणार होती.मात्र पुरस्कारासाठी पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदाराकडे पैसे मागितल्याने,त्या ठेकेदाराने पलायन केले.या योजनेसाठी आवश्यक असलेला ठेकेदार मी कर्नाटकातून आणला होता.परंतु तो मध्येच काम सोडून गेल्यामुळे ही योजना निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही,असा आरोप सुद्धा यावेळी राणे यांनी केला.राजन तेली यांच्या प्रचारासाठी श्री.राणे आज सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना जोरदार टार्गेट केले.

श्री राणे पुढे म्हणाले,मी मंत्री असताना सी-वर्ल्ड सारखा प्रकल्प मालवणात आणला होता.त्यासाठी मी शंभर कोटी तरतूद केली होती,आणि ते पैसे जिल्हाधिकाऱ्यांच्या तिजोरीत जमा देखील झाले होते.मात्र तो निधी केसरकरांना त्यांच्या चष्म्यातून दिसला नाही.त्यामुळेच तो निधी पुन्हा महाराष्ट्र शासनाकडे जमा झाला,जर या ठिकाणी सी-वर्ल्ड सारखा प्रकल्प झाला असता,तर या ठिकाणचे वातावरण त्यासाठी पोषक होते.त्याच बरोबर गोवा राज्य लगत असल्यामुळे व विमानतळाची सुविधा उपलब्ध होत असल्याने,येथील पर्यटनात नक्कीच वाढ झाली असती.मात्र ते केसरकरांना दहा वर्षात जमले नाही.आता त्यांची कारकीर्द संपत आली आहे.त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षात याठिकाणी मी “सी-वर्ल्ड” उभा करून दाखवतो,असाही दावा श्री.राणे यांनी केला.
ते पुढे म्हणाले,केसरकरांना विधानसभा-विधान परिषद सभागृहात कसे उभे राहतात हे माहीत नव्हते,एखाद्या सर्कशीतल्या जोकरा प्रमाणे उभे राहणाऱ्या व वागणाऱ्या केसरकरांना राजकीय शिस्त पहिल्यांदा मी शिकवली,अशीही खिल्ली त्यांनी यावेळी बोलताना उडवली.
यावेळी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली,माजी खासदार निलेश राणे,नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,सभापती पंकज पेडणेकर,संदीप कुडतरकर,संजू परब,राजू बेग,गुरुनाथ पेडणेकर,सुधीर आडिवरेकर,दिलीप भालेकर,

\