Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातुळस-मातोंड मतदारसंघात शिवसेनेला धक्का.

तुळस-मातोंड मतदारसंघात शिवसेनेला धक्का.

शिवसेना माजी विभागप्रमुख गोविंद गवंडे यांचा भाजप प्रवेश…

वेंगुर्ले : ता.१९
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळू परब व उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांच्या तुळस जि. प.मतदारसंघातील जेष्ठ माजी विभागप्रमुख गोविंद गवंडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला हादरा बसला आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्यात असून शेवटच्या दिवशी गवंडे यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी साईप्रसाद नाईक, तुळस सरपंच शंकर घारे, संतोष शेटकर, प्रज्ञा ढवण, रामू परब, विनय गोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments