दीपक केसरकर बापुसाहेब महाराजांची संस्कृती विसरले का…?

2

राजन तेली:मला “ईडी”ची कोणतीही नोटीस नाही,नाहक बदनामीचा डाव…

सावंतवाडी ता.१९:

पराभवाच्या भितीने पालकमंत्री दीपक केसरकर अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका करीत आहेत,ते आता बापूसाहेब महाराजांची आणि सावंतवाडीची संस्कृती विसरले का?,असा सवाल भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.मला कुठल्याही प्रकारची “ईडी” चौकशीची नोटीस आली नाही.मी माझी माहीती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.त्यामुळे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री तेली यांनी आपल्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.त्यांच्यासोबत संजू परब,नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग ,मनोज नाईक ,मंदार कल्याणकर, राजू गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तेली म्हणाले,प्रचारादरम्यान मतदारसंघात गावागावात फिरताना ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला.जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रचंड उत्सुकता दिसून आली.ज्या पालकमंत्र्यांनी दहा वर्ष येथे सत्ता भोगली त्या दीपक केसरकर आणि साधी पाण्याची समस्या सोडवली नाही.आई माठणे ते आंबोली शिरशिंगे वेर्ले कलंबिस्त माडखोल आधी भागातही पाण्याची मोठी समस्या आहे किनारपट्टी भागातील नाही लोकांना एप्रिल-मे मध्ये खाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते हे मोठी समस्या प्रचारादरम्यान मतदारांनी उपस्थित केली चिपी विमानतळासाठी लावतो म्हणून साडेतीन हजार च्यावर युवकांचे अर्ज घेतले तलाठी कार्यालयात अर्ज सादर करण्यात आले मात्र या विमानतळावर एवढ्या नोकऱ्या आहेत का हे जेव्हा युवकांच्या लक्षात आले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी त्यांना सांगितले.
आज ्रचारादरम्यान मिळालेला पाठिंबा लक्षात घेता माझा आत्मविश्‍वास वाढला असून त्यापेक्षाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उडायची सभा रद्द करून सावंतवाडीत येऊन सभा घ्यावी लागली आणि एका अपक्ष उमेदवार याची धास्ती केसरकर यांना घ्यावी लागली यामध्ये माझा आत्मविश्वास वाढल्याचे तेलियाने बोलताना सांगितले त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारी आरोग्याची सोय रस्त्याची झालेली चाळण किनारपट्टी भागातील पाण्याचा प्रश्न मोबाईल नेटवर्क ची सुविधा आधी जनतेच्या मूलभूत हक्कांना येणाऱ्या काळात हात घालणार असून ज्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या प्रचारात मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभारी असल्याचे ते म्हणाले.
चौकट
गोवा सरकारची सुट्टी जाहीर
21 ऑक्टोंबर रोजी च्या विधानसभा निवडणुकीसाठी गोवा राज्यात ोकरीला जाणार्‍या सिंधुदुर्गातील तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे आपण गोव्याच्या मुख्यमंत्रांचे आभार मानतो असे तेली यांनी बोलतांना सांगितले

6

4