बांद्यात राजन तेली यांच्या प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद

79
2
Google search engine
Google search engine

बांदा.ता,१९:
भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारफेरीला बांदा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची विकासात्मक प्रगती साधण्यासाठी राजन तेली यांना विधानसभेवर पाठवा, असे आवाहन गोव्याचे आ. दयानंद सोपटे यांनी बांद्यातील मतदारांना केले. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा भक्कम पाठिंबा असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे उमेदवार राजन तेली यांनी सांगितले.
कट्टा कॉर्नर येथून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी गोवा भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, पं. स. सदस्य शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, बांदा भाजप शहर अध्यक्ष घनश्याम सावंत, ग्रा. पं. सदस्य हर्षद कामत, मंगल मयेकर, जावेद खतीब, अंकिता देसाई, मनाली नाईक, संदिप बांदेकर, बाळा आकेरकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सुधीर शिरसाट, प्रसाद वाळके, सिद्धेश महाजन, रिया वाळके, रुपाली शिरसाट, समीर कल्याणकर, सचिन नाटेकर, प्रविण नाटेकर, नंदू कल्याणकर, साईनाथ धारगळकर, साईराज साळगावकर, अनिल पावसकर, ऋषिकेश सावंत, सागर सावंत, प्रेमानंद नाडकर्णी आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजन तेली यांनी बाजारपेठेत व्यापारी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी पालकमंत्री केसरकर यांच्या अपयशाचा पाढा वाचला. मतदारांनी परिवर्तन करण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन प्रमोद कामत यांनी केले.