बांदा-तपासणी नाक्यावर बेकायदा दारू वाहतुक रोखली…

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

४१ हजाराचा मुद्देमाल जप्त; स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई…

बांदा ता.१९:
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दुचाकीवर बांदा पोलीस तपासणी नाका येथे कारवाई करण्यात आली. २१ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धनंजय भानू सावंत (वय ४५, रा. कारीवडे-पेडवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थिर सर्वेक्षण पथकाने सायंकाळी उशिरा केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ झेड ३१६२) तपासणीसाठी थांबविण्यात आले. त्याच्याकडे गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या २९६ बाटल्या आढळल्या. दुचाकीस्वाराला मुद्देमालासह बांदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. २१ हजार ३१२ रुपयांची दारू व २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ४१ हजार ३१२ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

\