वैभववाडीत मुसळधार….!

2

भात शेतीचे नुकसान; शेतकरी चिंताग्रस्त…

वैभववाडी ता.२०: 

तालुक्यात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. या पावसाने कापणीला आलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आक्टोबर महिना संपत आला तरी अजूनही पाऊस जायचे नाव घेत नाही. भात शेती पूर्णपणे तयार झाली असून शेतकऱ्याने कापणीला सुरुवातही केली आहे. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. कापलेल्या शेतीचे नुकसान होत आहे. तर पावसामुळे भात शेती आडवी झाल्यामुळे भात शेती कुजून नासधूस होत आहे. हातातोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

5

4