खालची देवली खाडीपात्रात आढळला मृतदेह…

122
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पोलिस घटनास्थळी दाखल ; मृतदेह स्थानिक ग्रामस्थाचा असल्याचे निष्पन्न…

मालवण, ता. २० :

खालची देवली येथील कर्ली खाडीपात्रात आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान एक मृतदेह आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता हा मृतदेह डॉमनीक पीटर फर्नांडिस वय-५४ रा. गवाणवाडी खालची देवली यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खालची देवली येथील कानडे कोळंबी प्रकल्पानजीकच्या कर्ली खाडीपात्रात आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान स्थानिक ग्रामस्थांना एक अनोळखी मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती पोलिस पाटील आनंद देऊलकर यांना दिल्यावर त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधत याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी सुभाष शिवगण, सिद्धेश चिपकर, राजन पाटील आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह स्थानिकांच्या मदतीने किनार्‍यालगत आणण्यात आला आहे. चौकशीअंती हा मृतदेह गवाणवाडी येथील डॉमनीक फर्नांडिस यांचा असल्याचे निष्पन्न झाले. डॉमनीक यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ते दारूच्या नशेतच खाडीपात्रात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

\