निवडणूक काळात रोख रक्कम बाळगल्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई…

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवलीतील प्रकार;२ लाख ३६ हजाराची रोकड जप्त…

कणकवली ता.२०:

निवडणूक काळात पैशाचे वाटप करत असतांना एका ठेकेदारावर छापा टाकून पोलिसांनी २ लाख ३६ हजार रुपये जप्त केले.ही कारवाई कणकवली मनोहर शिल्प येथील निनाद कंट्रक्शन येथे पोलीस आणि निवडणूक विभागाच्या फिरत्या पथकाने केली.रामदास विखाळे असे त्याचे नाव आहे.पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शिवाजीराव कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या एका पथकाने रामू विखळे यांच्या मनोहर शिल्प कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली.यावेळी काही कार्यकर्ते पैसे घेऊन जात असताना दिसून आले.तर रामू विखाळे यांच्या जवळ दोन लाख ३६ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी निवडणूक शाखेचे फिरते पथक प्रमुख श्री.लाड त्यांच्या अधिकार्‍यांना बोलावून घेऊन ही रक्कम पंचनामा करून त्यांच्याकडे केली.हि करवाई  पोलीस व निवडणूक भरारी पथकाने केली.यात बळवंत खोराटे,ए.एस. साय, प्रमोद सुर्वे यांचा समावेश होता.दरम्यान उशिरा पर्यत या प्रकरणी चौकशी सुरू होती.

\