सावंतवाडी ता.२०:
कोलगाव येथून २० वर्षीय विवाहिता काल सकाळपासून बेपत्ता असल्याची घटना घडली आहे.चेतना चंदन अडेलकर (रा.चाफेआळी) असे तिचे नाव आहे.याबाबतची फिर्याद तिचे पती चंदन अनंत आडेलकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चेतना ही काल सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर पडली.दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.तिच्या घरातल्यांनी उशिरा पर्यंत तिचा नातेवाईकांकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र आज दुपारपर्यंत तिचा थांगपत्ता कळू न शकल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दिली आहे.त्यानुसार याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.