सव्वा दोन लाख मतदार ठरवणार सावंतवाडीचा आमदार…

2

सुशांत खांडेकर: 24 तारखेची मतमोजणी प्रकीया नव्या तहसीलदार कार्यालयात….

सावंतवाडी ता.२०:

येथील विधानसभा मतदार संघासाठी उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सावंतवाडीसह वेगुर्ले आणि दोडामार्ग मतदारसंघातील तब्बल २ लाख २४ हजार ७१९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत.२४ तारखेला होणारी मतमोजणी प्रक्रिया येथील नवीन तहसीलदार कार्यालय होणार आहे.याबाबतची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिली.

यात १ लाख ११ हजार १११ महिला मतदार तर १ लाख १३ हजार ६०८ पुरुष मतदार आहेत.सकाळी ७:०० वाजता मतदानाला सुरुवात होणार असून,सायंकाळी ६:०० वाजता मतदान प्रक्रिया बंद होणार आहे.सदरची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण ३०८ केंद्रावरील मतदान यंत्र पोलीस बंदोबस्तात सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे आणण्यात येणार आहेत.तर २४ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतदान मोजणीला सुरुवात होणार असल्याचे श्री.खांडेकर यांनी सांगितले.
संपूर्ण मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यात ६२ हजार ९८२ मतदार आहेत,त्यामध्ये ३० हजार १५० पुरुष तर ३२ हजार ८३६ महिला मतदार आहेत,
सावंतवाडी तालुक्यात १ लाख १७ हजार ७६७ मतदार असुन त्यामध्ये ५६ हजार ६९७ पुरुष तर ५८ हजार ७० महीलां मतदार आहेत.दोडामार्ग मध्ये ४० हजार ९६६ मतदार असुन त्यात २० हजार ७६१ पुरुष तर २० हजार ९६६ महीलां मतदार आहेत.

7

4