केसरकरांच्या विरोधात मॅसेज टाकून एका युवकाकडून राजन तेलींना”ब्लॅकमेलिंग”…

104
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रथमेश तेलींचा आरोप; पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती…

सावंतवाडी ता.२०:पालकमंत्री दीपक केसरकर यांना मतदान न करता राजन तेलींना मतदान करा,असा मेसेज पाठवून मतदार संघातील एक युवक  ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांनी केला.याबाबत आपण पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सोशल मीडियावर फिरत असलेल्या त्या मेसेज बाबत आपला कोणताही संबंध नाही.दरम्यान तो बोगस मेसेज पाठवणारा कोण,त्याच्या मागे नेमका कोण आहे? याचा शोध आम्ही घेणार आहोत.तसेच पालक मंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत जनतेच्या मनात चीड असल्यामुळे हा प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही,असे तेली यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आज सायंकाळी एक मेसेज केला होता.मुख्यमंत्र्यांनी केसरकर यांच्याशी चर्चा केली व त्यांना माघार घेण्यास सांगितली आहे.त्यामुळे राजन तेलींना मतदान करा असे त्यात म्हटले होते.परंतु हा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री केसरकर यांनी तो मेसेज बोगस असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले होतेत्यानंतर प्रथमेश तेली यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे.

\