नारायण राणे, नीतेश राणे यांचा विश्वास ; वरवडे येथे बजावला मतदानाचा हक्क
कणकवली.ता.२१:कणकवली विधानसभा मतदारसंघाचा निकाल एक तर्फे लागेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केला. कणकवली तालुक्यातील वरवडे फणस वाडी येथील मतदान केंद्रावर राणे कुटुंबीयांनी आज मतदानाचा हक्क बजावला याबद्दल नारायण राणे नीतेश राणे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
नारायण राणे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत आमचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांची ताकद एकत्र आलेली आहे त्यामुळे आमदार नितेश राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील किंबहुना कणकवलीची निवडणूक एकतर्फी होईल.
आमदार नितेश राणे म्हणाले सन 2014 पासून मी नेहमीच कणकवली मतदार संघातील प्रत्येक मतदाराच्या संपर्कात राहिलो आहे. गेल्या पाच वर्षात विकासाची अनेक कामे आम्ही मार्गी लावली आहेत. तसेच कार्यकर्त्यांची ताकत आमच्या पाठीशी भक्कमपणे आहे. त्यामुळे कणकवली मतदारसंघात आमचे मताधिक्य मोठे असेल. राज्यात पहिल्या पाच मोठ्या मताधिक्क्यामध्ये आमचाही नंबर असेल असे नितेश राणे म्हणाले.