कुर्ली येथील कॉलेज विध्यार्थीनीचा तापाने मृत्यू

81
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,२१: तालुक्यातील कुर्ली खडकदारा येथील विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थीनी कु. नीता बाळकृष्ण हुंबे वय १८ वर्षे हिचा तापाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ११. वाजण्याच्या सुमारास घडली.
कु. नीता हुंबे हिला गेले दोन-तीन दिवस ताप येत होता. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला फोंडाघाट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा अचानक रक्तदाब कमी झाल्याने तिची प्रातज्योत मालवली. नीता ही लहानपणापासून हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळख होती. शालेय शिक्षण कुर्ली येथे झाले. तर पुढील शिक्षण आचिर्णे येथे सुरू होते. सध्या ती बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुर्ली गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी तिच्या मृतदेहावर कुर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी कर्मचारी बाळकृष्ण हुंबे यांची ती मुलगी होत तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण, आजी, काकी, चुलत भावंडे असा मोठा परिवार आहे.

 

\