जनतेच्या पाठींब्याच्या जोरावर माझा मोठ्या मताधिक्याने विजय…

2

वैभव नाईक यांचा दावा ; दोन्ही तालुक्यातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण, ता. २१ : कुडाळ-मालवण मतदार संघातील जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे याच जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर माझा मोठ्या मताधिक्क्याने विजय होईल असा दावा आमदार तथा शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी येथे केला.
मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर आज आमदार वैभव नाईक यांनी शहरात तसेच तालुक्यातील विविध मतदानाच्या बूथवर जात कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. सर्वच ठिकाणी शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षात मतदार संघातील विविध विकासात्मक कामे मार्गी लावण्यावर भर दिला. कुडाळ-मालवण मतदार संघातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होता आले. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांचे आशिर्वाद आपल्याच पाठीशी आहेत हा विश्‍वास आहे. त्यामुळे येत्या २४ तारखेला मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

3

4