वैभववाडीत सरासरी अंदाजे ६४.टक्के मतदान

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

वैभववाडी/पंकज मोरे.ता,२१: वैभववाडी तालुक्यात सार्वत्रिक विधानसभा मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सरासरी अंदाजे ६४ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता उत्सुकता ‘विजयाचा गुलाल कोण उधळणार’ याकडे लागली आहे.
तालुक्यात सकाळपासूनच उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. पावसानेही उसंत घेतल्याने मतदारांमध्ये दिवसभर उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सकाळच्या सत्रात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांची उच्चांकी रांगा लागल्या होत्या. तालुक्यात एकूण अंदाजे ६४ टक्के मतदान शांततेत पार पडले. कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
दिवसभर तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. कणकवली, वैभववाडी व देवगड या मतदारसंघात ७ उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत. मात्र खरी लढत ही शिवसेना विरूध्द भाजप अशी पाहायला मिळणार आहे. निवडणुकांचा निकाल दि. २४ तारीखला लागणार असून ‘विजयाचा गुलाल कोण उधळणार’ याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

\