26 रोजी कसाल येथे भव्य नरकासुर स्पर्धा….

2

सिंधुदुर्गनगरी ता. 22

युवा प्रतिष्ठान कसाल यांच्यावतीने जिल्हास्तरिय भव्य नरकासुर स्पर्धा शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता कसाल बस स्थानक येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 5 हजार, व्दितीय 3 हजार ठेवण्यात आले आहे. तर लहान गट(15 वर्षाखालील) प्रथम क्रमांक एक हजार 111, द्वितीय क्रमांक 777 पारितोषिक देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांनी 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावयाचे आहे. स्पर्धकांनी 24 पर्यंत अण्णा पेडणेकर (8855808180) यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

138

4