२६ रोजी बांदा येथे खुली नरकासुर स्पर्धा…..

2

सागर सावंत मित्रमंडळाचे आयोजन….

बांदा ता.२२:
येथील सागर सावंत मित्रमंडळाच्यावतीने नरक चतुर्दशी निमित्त शनिवार दिनांक २६ रोजी खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ही स्पर्धा रात्री ८ ते १० या वेळेत बांदेश्वर मंदिर नजीक, देऊळवाडी येथे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्या नरकासुर मित्रमंडळांना अनुक्रमे ७०००, ४०००, २०००, १००० व १००० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून अधिक माहितीसाठी सर्वेश मुळ्ये किंवा सागर सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

4

4