कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी “एटीएसईएस” यंत्रणेची उभारणी

86
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एल के वर्मा :तांत्रिक बिघाडा बाबत मिळणार तात्काळ माहिती

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.२२: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या व पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी “एटीएसईएस” ही टेक्नॉलॉजी आजपासून सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी व वेरणा येथे ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
अचानक गाडीत होणारे बिघाड, व्हील जाम होणे या सारख्या समस्या या यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ उघड होणार आहेत. यापूर्वी ही यंत्रणा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती.मात्र चाकांची संख्या जास्त असल्यामुळे एखादी व्यक्ती तपासणी करत असताना काही त्रुटी राहण्याची शक्यता होती.मात्र आता नव्याने बसविण्यात आलेल्या या यंत्रणेमुळे थेट कॅमेरा आणी डीटेक्टरच्या साह्याने तात्काळ एखादी समस्या समजण्यासाठी मदत होणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेचे अधिकारी एल.के. वर्मा यांनी दिली. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते मात्र आता थेट नव्याने बसविण्यात आलेल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मेल एक्सप्रेसला त्याचा फायदा होणार आहे.त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे रेल्वेमार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले

\