तिलारी कालवा विभागात ओटवणे इन्सुलीत “अपहार”…

90
2
Google search engine
Google search engine

बाबू सावंत; सावंतवाडी तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी…

सावंतवाडी.ता,२३:
तिलारी कालवा विभागाच्यावतीने ओटवणे व इन्सुली येथे करण्यात आलेल्या.कामात मोठा अपहार झाला आहे. संबंधित विभागाला करोडचा निधी देऊन सुद्धा त्याठिकाणी अद्याप पर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी आज येथे आयोजित बैठकीत केली.
दरम्यान पावसाचे प्रमाण लक्षात घेता याठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा असेही मागणी यावेळी उपसभापती संदीप नेमळे कर यांनी केली. या ठरावाला सर्वानी अनुमोदन दिले.सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पं.स. उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले तसेच पं. स. सदस्य उपस्थित होते.
तब्बल दोन वर्षानंतर तिलारी खात्याचे अधिकारी पंचायत समिती बैठकीला आले असता. सर्वच सदस्यांनी त्यांना जाब विचारला. ओटवणे व इन्सुली भागात तिलारी प्रकल्पातील कालव्याची कामे गेली कित्येक वर्षे सुरु आहेत.याबाबत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत अजून किती वर्षे ही कामे चालणार आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळणार कधी असा सवाल केला. या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा काळा बाजार असल्याचा आरोपही सदस्य सावंत यांनी केला. या खात्याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी आला. मात्र, या निधीतून केली जाणारी कालव्यांची कामे निकृष्ट दर्जाचीच होत आहेत. कित्येक ठिकाणी बांधकामे कोसळण्याचे प्रकारही घडत आहेत. इन्सुली येथील तसेच ओटवणे या भागातील कालव्यांच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे.याबाबत सखोल चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पं.स. सदस्य रवी मडगावकर यांनी तिलारी विभागाला सातत्याने पत्र देऊनही कोणीही अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नाहीत.तिलारी विभागाच्या कामांचा आढावा सभागृहात मिळत नाही. दोन वर्षे झाली तरी तुम्ही कोठे होता असा जाब विचारला. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटीनंतर सावंतवाडी तालु्नयातील गळती असलेल्या धरणांचे स्ट्र्नचरल ऑडीट करण्याचा ठराव पंचायत समितीने घेतला होता.तसेच या भागातील धरणे सुस्थितीत आहेत.का याचाही अहवाल तिलारी खात्याकडे मागविला होता. मात्र, तो अद्याप देण्यात आला नाही याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्य्नत केली. या खात्याचा कारभार नियोजनशून्य आहे. त्याला कोणीच वाली नाही अशी टीकाही सदस्यांनी केली.
सध्या सावंतवाडी तालु्नयात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाची अपरिमित अशी हानी झाली आहे.
याची दखल राज्यशासनाच्या कृषी खात्याने घेऊन त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तालु्नयात भातपिकांचे जेवढे नुकसान झाले आहे त्यांचा तातडीने पंचनामा केला जावा अशी मागणी सदस्य मडगावकर यांनी केली. त्यावर याबाबत ठराव घेण्यात आला. कृषी खात्याने चार हे्नटरमध्ये केलेल्या बांबू लागवडीवरुन सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी आक्षेप घेतला.ही लागवड झालीच नसल्याचे त्यांनी सांगितले. तर सभापती पेडणेकर यांनी यात हस्तक्षेप करीत सावंत यांनी अगोदर माहिती घ्यावी व त्यानंतरच बोलावे अशी सूचना केली. यात सभापती पंकज पेडणेकर व सदस्य सावंत यांच्यात तूतूमैंमै झाली. सभापती यांनी मनाला लावून घेऊ नये. आम्ही प्रत्येक खात्याच्या अधिकाऱ्यांना थेट विचारणार असे सावंत यांनी सांगितले. अखेरीस बांबू लागवड करण्यात आलेल्या जागेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचा ठराव घेण्यात आला.
शासनाच्या जटील नियमांमुळे चौदाव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींनी खर्च न केल्यामुळे याबाबत सदस्यांनी नाराजी व्य्नत केली. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा ठराव घेण्यात आला. शालेय पोषण आहाराच्या धान्यांची बिले जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे मुलांच्या पोषण आहारात कोणतीही अडचण येणार नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.