नेतर्डे येथील ब्राह्मणी मंदिरात धार्मिक कार्यक्रम….

101
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.२३:
नेतर्डे येथील श्री देवी सातेरी ब्राम्हीणी मंदिरामध्ये शुक्रवार दिनांक २५ रोजी गुरूद्वादशी निमित्त सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता देवतांची पूजा, ग्रंथपूजा, गुरुपूजा, ग्रंथवाचन, नामस्मरण, आरती, तिर्थप्रासाद, महाप्रसाद होणार आहेत. सायंकाळी स्थानिकांची भजने व महिलांचा फुगडी कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता कीर्तनकार ह. भ. प. जनार्दन आंब्रे यांचे कीर्तन होईल. तरी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

\