वेंगुर्ले-परबवाडा येथे विद्युत तारेचा धक्का लागून बैल मृत्यूमुखी…

2

वेंगुर्ले : ता.२४
बैलाला चरण्यासाठी शेतामध्ये नेत असताना वाटेत लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा धक्का लागून बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना आज गुरुवारी सकाळी वेंगुर्ला-परबवाडा येथे घडली. या दुर्घटनेमुळे बैलाच्या मालकाचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
परबवाडा-तिन पिपळ येथील शेतकरी चंद्रकांत वसंत परब हे आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या बैलाला घेऊन त्याला चरण्यासाठी  स्वतःच्या शेतामध्ये जात होते. दरम्यान, आयनाड येथे विजेची तार तुटून लोंबकळत होती. या विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेचा धक्का बैलाला लागला आणि तो जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची खबर विद्युत मंडळाला व पोलिस स्टेशनला समजताच त्यांची धाव घेत पहाणी केली. यावेळी बैल मालक चंद्रकांत परब, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत व ग्रामस्थ सुनिल परब आदी उपस्थित होते.

3

4