लोकांनी दिलेला कौल मान्य…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बबन साळगावकर;पैशाचा वापर झाल्याने माझा पराभव…

सावंतवाडी ता.२४:मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला,त्यामुळे आपल्याला पराभव सहन करावा लागला,मात्र मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.पैशाच्या वापरामुळे लोकांची मते फिरत असतील तर भविष्यात लोकशाही टिकणे कठीण आहे.ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे,असेही त्यांनी सांगितले.
श्री.साळगावकर यांनी पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली.विद्यमान नगराध्यक्ष असताना श्री.साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते.व विधानसभा निवडणूक लढवली होती.मात्र आज झालेल्या निकालानंतर त्यांना पराभव सहन करावा लागला.

\