वैभववाडीत नितेश राणेंची उत्साहात विजय रॕली

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शहरात उत्साहाचे वातावरण; घोषणांनी शहर दणाणले

वैभववाडी/पंकज मोरे.ता,२५: सकाळपासूनच वरूण राजाची रिपरिप, नागरिकांनी विजय रॕलीवर केलेली पुष्पवृष्टी व आभिर गुलालांची उधळण, ढोल ताशांच्या गजरात वंदे मातरम्…भारत माता की जय…भारतीय जनता पार्टीचा विजय असो..! राणे साहेब आगे बढो…हम तुम्हारे साथ है..! च्या घोषणा देत वैभववाडी शहर दणाणून सोडले.
विधानसभा निवडणुकींचा निकाल गुरूवारी लागला. कणकवली मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. निकालापूर्वी उमेदवारांसह पदाधिका-यांसहा कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक दिसून येत होती. राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र भाजपकडून नितेश राणे तर शिवसेनेकडून सतिश सावंत अशी लढत पाहायला मिळाली. अखेर नितेश राणे यांना २८ हजार ५७७ इतके मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळविला आहे.
शुक्रवारी सकाळी वैभववाडी शहरात भाजप पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांची विजयी रॕली काढली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, नगराध्यक्षा दिपा गजोबार, महिला तालुका प्रमुख स्नेहलता चोरगे, विकास काटे, दिलीप रावराणे, दिगंबर मांजरेकर, प्रकाश पाटील, नगरसेवक संतोष पवार, संतोष माईणकर, संजय चव्हाण, रविंद्र रावराणे, संजय सावंत, अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर, विद्या पाटील, भारती रावराणे, नावळे सरपंच स्नेहा शेळके, गडमठ सरपंच श्रीमती पावले, शुभांगी पवार, वैशाली रावराणे, दिपक गजोबार, सुनिल रावराणे, संतोष कुडाळकर, नवलराज काळे, रितेश सुतार, आशिष रावराणे, बाळा कदम, रत्नाकर कदम, शिवाजी राणे, संजय लोके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॕलीत सहभागी झाले होते.

फोटो- वैभववाडीत आ. नितेश राणेंची विजयी रॕली. छाया- पंकज मोरे

\