कोकणात “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी करणार…

78
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर:नुकसानीचे पंचनामे करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना…

सावंतवाडी.ता,२५:  येथिल अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेली नुकसानी लक्षात घेता कोकणात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री व पुनर्वसन मंत्र्यांकडे करणार आहे.अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान किनारपट्टीत सुरू असलेल्या कायर या वादळामुळे लोकांनी भयभित होण्याची गरज नाही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आपण पण या भागाचा लवकरच दौरा करणार आहे.असेही त्यांनी सांगितले.
श्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी अशोक दळवी, राजन पोकळे आदी उपस्थित होते.केसरकर म्हणाले मोठ्या प्रमाणात गेले दोन दिवस पाऊस झाला आहे. ही परिस्थिती नैसर्गिक असल्यामुळे त्यावर मात करता येऊ शकत नाही.परिणामी अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान लक्षात घेता तात्काळ भातशेतीचे पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार तात्काळ पंचनामे करण्यात येतील ज्या लोकांचे नुकसान झाले आहे.त्यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधावा. श्री केसरकर पुढे म्हणाले किनारपट्टी भागात वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.मात्र आपण दौऱ्यानिमित्त मुंबई येथे जात असल्यामुळे आता त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही.त्यामुळे मुंबईतून या ठिकाणी आल्यानंतर मच्छीमारांची भेट घेणार आहेत.व झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

\