बांद्यात मुसळधार पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळली…

77
2
Google search engine
Google search engine
Google search engine

निगुडे-राणेवाडी येथील घटना;५० हजाराचे नुकसान…

बांदा ता.२५:
निगुडे-राणेवाडी येथील नारायण शांताराम राणे यांच्या घराची मातीची भिंत आज मुसळधार पावसाने कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही,मात्र राणे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
      निगुडे तलाठी श्रीमती शिंदे,ग्रामसेविका तन्वी गवस, पोलीस पाटील सुचीता मयेकर, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली व पंचनामा केला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने घराची भिंत कोसळल्याचे उपसरपंच गवंडे यांनी सांगितले. ५० हजार रुपये नुकसानीची नोंद करण्यात आली.
\