दूध विकास संस्थांची पत्रकार परिषदेत मागणी; प्रशासनाला देणार निवेदन…
सावंतवाडी ता.२६:
अवकाळी पावसामुळे व कायर वादळामुळे जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे चाऱ्याची नुकसान भरपाई देण्याबरोबरच दोन हजार रुपये प्रतिगुंठा शेती नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत,अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषद दुग्ध व्यावसायिक संघाच्या माध्यमातून करण्यात आली.तालुक्यातील दुग्ध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी दुग्ध सहकारी संस्थांचे संतोष सावंत,गुरुनाथ पेडणेकर,प्रमोद गावडे,प्रमोद सावंत,रवींद्र म्हापसेकर,प्रवीण देसाई,हरिश्चंद्र तारी, शांताराम बांदिवडेकर,ज्ञानेश परब आदी उपस्थित होते.