केळुस कालवीबंदर येथील समुद्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट…

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

“क्यार”या चक्री वादळाने झाली आहे मोठी हानी…

वेंगुर्ले : ता.२६
काल सकाळी “क्यार”या चक्री वादळाने वेंगुर्ले तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथील समुद्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची मोठी हानी केली. त्यांची चौकशी करण्यासाठी व धीर देण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपण सर्वजण आपल्या सोबत असल्याचे सांगितले.
काल सकाळी “क्यार”या चक्री वादळाने वेंगुर्ले तालुक्यातील केळूस-मोबार,कालवीबंदर किनारपट्टीला हाहाकार माजवला आहे.त्यामुळे किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. किनारपट्टी लगतचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत केळुस कालवीबंदर येथील समुद्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची चौकशी करण्यासाठी व धीर देण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती निलेश सामंत, माजी सरपंच म्हापण नाथा मडवळ, मच्छीमार नेते दादा केळुसकर यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची विचारफुस करून पाहणी केली. यावेळी गावातील ग्रामस्थ रमेश केळुसकर, बाबुराव ताम्हणकर, प्रमोद केळुसकर, नाना वराडकर, मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष दादू केळुसकर, गुरू जोशी, दादा राऊळ यांच्यासह मच्छीमार बांधव उपस्थित होते.

\