संजू परब; दिवाळीनिमित्त आयोजन,महाराजांच्या आठवणींना उजाळा…
सावंतवाडी ता.२६: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने सावंतवाडी शहरात दीपावलीनिमित्त किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.श्री.परब यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी सचिव संतोष सावंत उपस्थित होते.
श्री.परब म्हणाले,आजच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या इतिहासा विषयी माहिती व्हावी,तसेच ऐतिहासिक ठेव्याचे भान राहावे यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून सावंतवाडी शहरात गेली कित्येक वर्षापासून किल्ले बनविण्याची प्रथा जपली जात आहे, मात्र या कलेला जास्तीत जास्त वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पाच हजार द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार तर उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली असून स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संजू परब यांनी केले.