ऐतिहासिक पालखी सोहळा २८ तारखेलाच होणार…

122
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

देवस्थान समितीने केले स्पष्ट : अफवांवर विश्वास ठेवू नका…

मालवण, ता. २६ : मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर-श्रीदेव नारायण भेट पालखी सोहळा नियोजित तारखेनुसार २८ आॅक्टोंबरलाच होणार असल्याचे देवस्थान कमिटीने स्पष्ट केले आहे.
दीपावली पाडव्यानिमित्त होणाऱ्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्यावर पावसाचे सावट होते. त्यामुळे हा पालखी सोहळा नियोजित तारखेला होणार का याबाबत साशंकता होती. या पालखी सोहळ्याबाबत अफवाही पसरत होत्या. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या देवस्थानच्या बैठकीत पालखी सोहळा हा २८ तारखेलाच होणार आहे. त्यामुळे भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट केले आहे.

\