कायदेतज्ञ बापू गव्हाणकर यांचे म्हणणे:कायदयातील पेचप्रसंगामुळे “क्लीनचिट”
सावंतवाडी,ता.२६: ऑक्टोबर(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पुर्वसंध्येला सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी राजीनामा मंजूर कसा केला? असा नवीन पेचप्रसंग निर्माण झाला आहे.दरम्यान प्रसिद्ध कायदेतज्ञ अँड.बापु गव्हाणकर यांनी कायदेशीर हवाला देत साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसायला हरकत नाही, असे म्हटले आहे.
सावंतवाडी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे.
साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केला होता, तो राजीनामा त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला.जिल्हाधिकारी यांनी तो मंजूर केला आहे.
सावंतवाडी नगराध्यक्ष साळगावकर यांनी नियमाप्रमाणे राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याची कायद्यात तरतूद आहे. जिल्हाधीकारी यांच्याकडे प्रत्यक्ष राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सही घेण्याची तरतूद आहे परंतु साळगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा देण्याचे टाळत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे दिल्याने नवीन पेचप्रसंग निर्माण झाला आहे .
मुख्याधिकार्यांना साळगावकर यांचा राजीनामा स्वीकारण्याची कायद्यात तरतूद नाही तसेच मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला राजीनामा मंजूर करण्याची देखील कायद्यात तरतूद नसल्याचे जाणकार सांगतात.
दरम्यान सावंतवाडीचे प्रसिद्ध कायदेतज्ञ बापू गव्हाणकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५३(१) अन्वये नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यायला हवा होता.जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही .
सावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी मुख्य अधिकारी यांच्याकडे दिल्याने जिल्हाधिकारी यांना राजीनामा मंजूर करता येणार नाही, कायद्याने हा पेचप्रसंग निर्माण झाला असला तरी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर साळगावकर आजही बसू शकतात असे अँड. गव्हाणकर यांनी बोलताना सांगितले.
बबन साळगावकर यांना संपर्क साधला असता आपण मुख्याधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला आहे असे सांगितले .
साळगावकर यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांनी मंजूर करून कायद्याच्या तरतुदींचा भंग केला आहे असे म्हटले जाते.
जिल्हाधिकारी यांच्याकडे साळगावकर यांनी राजीनामा दिला नसल्याने त्यांनी तो मंजूर कसा काय केला ?असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे .
दरम्यान जिल्हाधिकारी यांना मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते भेटु शकले नाहीत.