मतिमंद मुलीवर बलात्कार…

211
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

संशयित महाविद्यालयाचा चतुर्थश्रेणी कर्मचारी ; तीन दिवसांची पोलिस कोठडी…

मालवण, ता. २७ : एका मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यात संशयित आरोपी म्हणून दिगंबर बाळकृष्ण ठाकुर वय-४२ रा. कट्टा वरची गुरामवाडी याला मालवण पोलिसांनी काल मध्यरात्री ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित युवती पाच महिन्याची गरोदर आहे. तर संशयित आरोपी दिगंबर हा तालुक्यातील एका महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे.
पीडित युवतीने तालुक्यातील एका शाळेत नववी पर्यंत शिक्षण घेतले आहे. गावातच एका ठिकाणी घरकाम करण्यास ती जात होती. काल सकाळी अकरा वाजता तीने आपल्या आईस पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट केले. आईने विचारपूस केली असता तिने दिगंबर ठाकूर याने महाविद्यालयाच्या शौचालयात जबरदस्तीने घेऊन जात तीनवेळा शारीरिक संबंध ठेवले व कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित युवतीच्या आईने आज ओरोस पोलिस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी दिगंबर ठाकूर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील करत आहेत.

\