सावंतवाडी-पालिका आणि पोलीस प्रशासन बनले अनाथाचे नाथ…

87
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तलावात पडलेल्या गावडेंवर अंत्यसंस्कार;नातेवाईकांनी नकार दिल्याने पुढाकार…

सावंतवाडी ता.२७: येथील मोती तलावात पडून मृत्यू झालेल्या प्रमोद महादेव गावडे (६७) या निराधार वृद्धासाठी सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी व पोलीसच आधार बनले.त्यांच्या पश्चात विधवा बहीण असल्यामुळे आणि त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे पोलिसांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.यावेळी सावंतवाडी पोलीस संजय कदम,महेश जाधव व श्री.परब आदींनी मदत कार्यात सहभाग घेतला होता.
आज सकाळी तलावात वृद्धाचा मृतदेह आढळून आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान उशिरा नंतर तो मृतदेह उभाबाजार येथील महादेव गावडे यांचा असल्याचे समजले.त्यांच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असता त्यांना विधवा बहीण असल्याचे समजले,दरम्यान आपली परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि प्रकृती बरी नसल्यामुळे आपल्याला मृतदेह ताब्यात घेणे अवघड होईल असे सांगितले.यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सहकार्याची भूमिका उचलत पालिकेच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

\