सावंतवाडी ता.२७: मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी या कुस्ती क्लबच्या वतीने २३ व २४ नोव्हेंबरला येथील शहरात मल्ल सम्राट केसरी ही स्पर्धा होणार आहे.ही स्पर्धा कुस्ती संघटनेच्या मान्यतेने होणार असून क्लबमार्फत प्रथमच येथे शहरात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मुलांमध्ये कुस्तीविषयी आवड निर्माण व्हावी व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्लबतर्फे ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी पुरुष गट : 45 किलो, 50 किलो, 57 किलो, 69 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो व व 80 ते 120 किलो अशा वजनी गटात तर महिला गट : 36 किलो, 40 किलो, 45 किलो, 50 किलो, 54 किलो, 58 किलो, 64 किलो, 66 किलो आणि 66 ते 100 किलो वजनी गटात स्पर्धा खेळवली जाणार आहे खेळाडूंनी प्रवेश अर्जासोबत आधार कार्डची सत्यप्रत जोडायचे आहे. येताना ओरिजनल आधार कार्ड आणावे तसेच खेळाडूस कोणतेही दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत अशा नियम व अटी स्पर्धेसाठी आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग द्यावा असे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष योगेश बेळगावकर (9168423928), सचिव ललित हरमलकर, (9673080812), खजिनदार किरण गोंधळी, सदस्य भूषण आरोसकर (9405272412), संकेत माळी (9067402917) यांच्याकडे नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडीत २३-२४ नोव्हेंबरला मल्ल सम्राट केसरी स्पर्धा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES