आदित्य ठाकरे ३० रोजी सिंधुदुर्ग दौर्‍यावर…

2

नुकसानग्रस्त भातशेतीची करणार पाहणी…

कणकवली, ता.२८ : सिंधुदुर्गसह कोकणात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भातपिकाची भरपाई मिळावी अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्याअनुषंगाने युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे ३० ऑक्टोबरला सिंधुदुर्गात येत आहेत. सकाळी १० वाजता सावंतवाडी, दुपारी १२ वाजता कुडाळ आणि दुपारी १ वाजता कणकवली तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेतीची ते पाहणी करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक तसेच शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी आज दिली.

4

4