प्रशासनाला घेराव:तात्काळ सुविधा द्या, अन्यथा माघार नाही आंदोलकांचा इशारा
सावंतवाडी ता.२९: येथील रुग्णालयात आवश्यक असलेल्या सोयीसुविधा नसल्यामुळे तालुक्यातील तब्बल तीन मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालया समोर आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान प्रशासनाने तात्काळ वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे,तसेच आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहित,तोपर्यंत माघार घेणार नाही,असा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
यावेळी रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर असलेली रुग्णवाहिका द्या,टेस्टिंग लॅब सेवा सुधारा, दीर्घ आजारावर औषध-उपचार तसेच तात्काळ शस्त्रक्रियेची सेवा द्या,आदी मागण्या ग्रामस्थांमधून बकरण्यात आल्या आहेत.
यावेळी पंचायत समिती सदस्य मानसी धुरी,स्वागत नाटेकर,गुणाजी गावडे,औदुंबर पालव,नितीन राऊळ,हरिश्चंद्र तारी,जितू गावकर,सुंदर आरोसकर,नाना पेडणेकर,सदा राणे,महेश धुरी,नरेंद्र मिठबावकर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.