राष्ट्रपती पदक विजेते,खान इन्स्टिट्यूटचे संस्थापक इनायतुल्ला खान यांचे निधन…

2

सावंतवाडी,ता.२९:येथील खान इन्स्टिट्यूटचे मालक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त केलेली इनायतुल्ला मुबारक खान यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
ही घटना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्यावर उदया सालईवाडा येथील स्मशानभूमीत  सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्री खान यांनी १९५६ मध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यात पहिली टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू केली होती. व ते स्वतः शिक्षण देत असत त्यामुळे ते प्रसिद्ध होते. होमगार्ड जिल्हा समादेशक म्हणून ते ते निवृत्त झाले होते. समाजकार्यात त्यांचे योगदान होते. गेले काही दिवस ते आजारी होते त्यांच्या पश्चात दोन मुली मुलगा असा परिवार आहे. संचालक सुरज खान यांचे ते वडील होते.

1

4