कातकरी महिला भगिनींना साडी भेट देवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज

2

वेंगुर्ले भारतीय जनता पार्टीचा उपक्रम

वेंगुर्ले : ता.३०
भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले-कॅम्प परिसरातील कातकरी ( वानरमारे ) महिला भगिनींना साड्या भेट देवून व दिवाळीचा फराळ देवुन अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ले सातत्याने वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवून जनमानसात एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन समाजातील उपेक्षित असलेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने प्रयत्न करण्यात आले .
दरम्यान यावेळी कॅम्प येथील कातकरी समाजाच्या लक्ष्मी पवार, संगीता निकम, अंजना पवार, सीमा निकम, रंजना पवार, काजल निकम, आका पवार, लक्ष्मी पवार, पुष्पा पवार , पुजा पवार, अंजनी निकम, पुष्पा पवार, रोशनी निकम, शारदा राठोड, छाया पवार, वासंती पवार , आशा पवार , पुजा पवार, वनीता पवार, मंजुळा निकम, पौर्णिमा निकम, संगीता पवार, अलका पवार, दसरी निकम, बेबी निकम इत्यादी महिला भगिनींना साडी भेट देवून भाऊबीज करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, जयंत मोंडकर, मनवेल फर्नांडिस, सुरेंद्र चव्हाण, नगरसेविका क्रुपा गिरप-मोंडकर , राधा सावंत, कीर्ती मंगल भगत , कीर्ती परब, रफिक शेख , पिंटू नाईक, आर.के.जाधव, प्रकाश धावडे, प्रणव वायंगणकर , प्रीतम सावंत तसेच कातकरी समाजाचे नीतीन पवार, अर्जुन पवार, दादा पवार उपस्थित होते.

5

4