भुईबावडा ग्रामपंचायतीचे शिपाई देवेंद्र मोरे यांचे निधन

185
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता, ३०:

भुईबावडा गावचे रहिवासी देवेंद्र ऊर्फ बाळू कृष्णाजी मोरे वय ४८ वर्षे यांचे मंगळवारी रात्री मुंबई भांडूप येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
एक हुरहुन्नरी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे अशी त्यांची ओळख होती. ते वृत्तपत्र विक्रेते होते. तसेच ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच नाजूक बनल्याने मंगळवारी रात्री ९. वाजण्याच्या सुमारास त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवणी. त्यांच्या निधनाचे वृत्त समजात भुईबावडा गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात्य पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, एक पुतण्या असा परीवार आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

\