गोवा बनावटीच्या दारूसह इनोव्हा गाडी पकडली ; मालवण पोलिसांची कारवाई…

109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त ; संशयितांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी…

मालवण, ता. ३० : गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना इनोव्हा गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. यात दारू व मोटार असा ५ लाख ४१ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काल रात्री पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, मंगेश माने, राजन पाटील, प्रसाद आचरेकर, विश्वास पाटील यांच्या पथकाने कुंभारमाठ वेंगुर्लेकडे जाणाऱ्या सागरी महामार्गावर मराई मंदिरासमोर नाकाबंदी केली असता इनोव्हा गाडी क्रमांक एम. एच. ०३ बीएस-३१८९ मधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार गाडीतील संतोष पांडुरंग देऊलकर वय-२८ रा. बिबवणे कुडाळ, लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर वय- ३५ रा. गाडीअड्डा वेंगुर्ले या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या दारूचे ६३ हजार ४९२ रुपये किंमतीचे ३९ बॉक्स व इनोव्हा गाडी ४ लाख ५० हजार असा मुद्देमाल जप्त केला.
आज दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील करत आहेत.

\