नितेश राणेंचं पंकजांकडून कौतुक

2

मुंबई, ता.३१ : भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नितेश राणे यांचं कौतुक केलं. भाजपचे तरुण आमदार म्हणून निवडून आला आहात, अशा शब्दात पंकजांनी नितेश राणेंबद्दल गौरवोद्गार काढले. तसंच नितेश राणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंकजा मुंडे या भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्यांनी राज्याचं महिला बाल कल्याण तसंच ग्रामविकास मंत्रीपद भूषवलं. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

1

4