नारायण राणे यांच्यासह भाजप शिष्टमंडळ घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट….

2

शेतकऱ्यांचा व मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात वेधणार लक्ष….

सिंधुदुर्गनगरी ता.३१:

सिंधुदुर्गव रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस व कायर वादळामुळे झालेल्या शेतकरी व मच्छीमारांच्या नुकसानी संदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,आमदार नितेश राणे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.यावेळी कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,भात शेतीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी.मच्छीमारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना ही मदत करावी,अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
यावेळी रवी चव्हाण,प्रसाद लाड,विनय नाथू,पटवर्धनजी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आदी उपस्थित असणार आहेत.

8

4