सावंतवाडी-वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन…
सावंतवाडी ता.३१: सिंधुदुर्ग जिल्ह्यात “क्यार” वादळामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून ‘ओला दुष्काळ” जाहीर करावा,तसेच मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दोघांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी,या मागणीसाठी आज येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव,जिल्हा महिला अध्यक्ष भावना कदम,मधू कदम,परेश जाधव,प्रज्ञा जाधव आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी,तसेच क्यार वादळामुळे झालेल्या मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचे सुद्धा तात्काळ पंचनामे करण्यात यावे,अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.