बांद्यात दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ…

2

बांदा, ता. ३१ :

दिवाळी अंक याेजनेचा शुभारंभ येथील नट वाचनालयात उद्याेजक व सामाजीक कार्यकर्ते शंकर ऊर्फ भाऊ वंळजु व उद्याेजक शशीकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष सुभाष माेर्ये, सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, जगन्नाथ साताेसकर, संचालीका स्वप्निता सावंत, ज्येष्ठ नागरीक शशिकांत बांदेकर, करीम आगा, नंदादीप केळुसकर, प्रकाश नाईक, ग्रंथपाल प्रमिला माेरजकर, अमिता परब, सुनिल नातु आदी उपस्थित हाेते. मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन या याेजनेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवराचे स्वागत एस. आर. सावंत यानी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुभाष माेर्ये यानी केले. उद्याेजक भाऊ वंळजु व शशिकांत पित्रे यांच्या देणगीतुन वाचकांसाठी दरवर्षी दिवाळी अंक याेजना साकारली जाते. आभार प्रकाश पाणदरे यानी मानले. सुत्रसंचालन राकेश केसरकर यानी केले.

12

4