तापसरीचा मालवणात दुसरा बळी…

94
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तापसरीचा मालवणात दुसरा बळी…

तालुक्यात खळबळ ; आरोग्य यंत्रणा गांभीर्याने लक्ष देणार का?…

मालवण, ता. ३१ : कांदळगाव परबवाडी येथील रहिवासी सुभाष जगन्नाथ वायंगणकर (वय-६२) यांचा तापसरीने मृत्यू झाला आहे. तापसरीने मृत्यू झाल्याची ही गेल्या दोन दिवसातील दुसरी घटना असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेने तालुक्यात कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे समोर येत आहे.
बांदिवडे मळावाडी येथील रहिवासी आणि मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा आठवीचा विद्यार्थी परिक्षित अनिल आसोलकर (वय-१४) याचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला होता. परिक्षित याच्या मृत्यूचे नेमके निदान अद्यापही स्पष्ट झाले नाही. कांदळगाव येथील सुभाष वायंगणकर यांचाही तापसरीने काल रात्री मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. सुभाष यांना गेले काही दिवस ताप येत होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविले. घरी त्यांना पुन्हा त्रास होऊन प्रकृती चिंताजनक बनली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
सध्या पाऊस आणि तापमानातील बदलांमुळे तालुक्यात तापसरीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यात दोघांचा मृत्यू अज्ञात तापाने झाला असताना आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तापसरीकडे शासनाची आरोग्य यंत्रणा याची गांभीर्याने लक्ष देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

\