सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत कार….

95
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कारण अस्पष्ट; गाडी पूर्णतः जळून खाक…

वेंगुर्ले ता.०१:

नेमळेतिठा येथे सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यावर अज्ञात कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे.ही घटना आज सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली.दरम्यान त्या गाडीसोबत कोणीही नसल्याने कारण अस्पष्ट राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गाडी आगीत जुळून पूर्णता भस्मसात झाली आहे.दरम्यान अजूनही गाडीमधून धुराचे लोळ सुरू आहेत.ही गाडी रात्री उशिरा किंवा पहाटे जळाल्याची शक्यता आहे.मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

\