तापसरीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक जिल्ह्यात दाखल…

81
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांकडून सूचना: भाजपाचे नेते राजन तेली यांची माहिती…

सावंतवाडी.ता,०१:
जिल्ह्यात गेले काही दिवस धुमाकूळ घालणाऱ्या तापसरीच्या आजारावर तोडगा काढण्यासाठी खास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक उद्या जिल्ह्यात दाखल होणार आहे. याबाबतचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्याने दिले आहेत.ही माहिती माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिली.उद्या येथील हॉस्पिटलमध्ये हे पथक दाखल होणार आहे. काल सायंकाळी उशिरा श्री तेली यांनी आयुक्त अनुप यांची भेट घेतली.दरम्यान याबाबत श्री तेली यांनी नाराजी व्यक्त केली आहे.गेले काही दिवस पालकमंत्री केसरकर यांचे जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न कडे दुर्लक्ष झाले आहे.मात्र काही झाले तरी मी आपण निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे.येणाऱ्या काळात सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला झळाळी प्राप्त करण्यासाठी, तसेच ज्या ठिकाणी चांगल्या सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील असा विश्वास श्री तेली यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर,बबलू सावंत उपस्थित होते.

\