सावंतवाडीत तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक दाखल….

79
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,०१:
तापसरीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व मुंबई येथील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आज सावंतवाडीत दाखल झाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनेनुसार आपल्याला शासनाकडून आदेश देण्यात आले त्या नुसार आपण पाहणी करण्यासाठी आलो आहोत.असा दावा पथकातील वैद्यकीय अधिका-यांनी केला.
दरम्यान वेत्ये येथील गणेश पाटकर या तापसरीने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी तपासणीसाठी ते पथक रवाना झाले आहे. सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद घेऊन हे पथक वस्तुस्थिती बद्दल माहिती देणार आहे.असे जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.

\