नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना मोफत सातबारा द्या…

2

युवासेनेच्यावतीने योगेश धुरी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी…

कुडाळ.ता,०१
अवकाळी पावसामुळे तसेच क्यार वादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांना मोफत सातबारा देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाधिकारी योगेश धुरी यांनी केली आहे.
याबाबत आपण उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.असे त्यांनी सांगितले.त्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे.यात गेल्या काही दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीची अवस्था लक्षात घेता गुंठा- गुंठा क्षेत्र असते.त्यामुळे प्रत्येकी पंधरा रुपये असा सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्याला शेकडो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.त्यामुळे या काळात संबंधित शेतकऱ्यांना सातबारे मोफत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

0

4